गावाची ग्रामपंचायत

तेर्सेबांबर्डे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. तेर्सेबांबर्डे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे ९ किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे २५ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १६ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या २०५६ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये ४ प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये १० कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व १ कर्मचारी आहेत. तसेच तेर्सेबांबर्डे गावास हागणदारी मुक्त गाव व निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेले आहेत